Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दिनेश वारंग यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे...

घावनळे गावातील शिवसैनिक व ग्रामपंचायत सदस्यांनी दिले खुले आव्हान…

दिनेश वारंग यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी केलेल्या पक्षांतरामुळे घावनळे गावातील शिवसैनिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यक्त केला संताप

घावनळे गावातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी - कृष्णा धुरी

कुडाळ : दोन दिवसांपूर्वी घावनळे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा मधून पक्षांतर करून अन्य पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे जाहीर केले होते. परंतु यावेळी गावातील ग्रामस्थांना चुकीची माहिती देऊन ग्रामपंचायत सभागृहामध्ये बोलवून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षप्रवेश केला असल्याचे शिवसेना (उबाठा) उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी स्पष्ट केले. दिनेश वारंग यांनी दिशाभूल करून एकूण दहा ग्रामपंचायत सदस्य पक्ष प्रवेशावेळी उपस्थित असल्याचे जाहीर केले होते, परंतु एकूण दहा सदस्यांपैकी पाच सदस्यांनी आपण शिवसेना (उबाठा) ,आमदार वैभव नाईक व महाविकास आघाडी सोबत असल्याचे यावेळी जाहीर केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मयुरी पिळणकर, रिया नागवेकर, मानसी बागवे, प्रभाकर जाधव, सुनील खोचरे हे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी दिनेश वारंग यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी केलेल्या पक्षांतराबाबत संताप व्यक्त केला. उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी दिनेश वारंग यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्याबाबत खुले आवाहन दिले.

यावेळी शिवसेना (उबाठा) उपविभाग प्रमुख पप्पू महाडेश्वर, शाखाप्रमुख संतोष नागवेकर, शाखाप्रमुख आनंद परब, शाखाप्रमुख सागर उर्फ बाबी भिंगारे, शाखाप्रमुख दीपक सावंत हे सर्व पदाधिकारी शिवसेना (उबाठा) व आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. घावनळे गावातील ग्रामस्थ दादा मेस्त्री, सागर पारकर, गौरव पारकर, रुपेश सावंत, विठ्ठल नागवेकर, रामचंद्र कोकरे, रामचंद्र तावडे, चंद्रकांत घाडीगावकर, गौरव राणे, सुदीप पारकर, साई बिले, सावन, साई राणे, मधुकर घाडीगावकर, गुरु राणे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

ruchira top