Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

अनिल पाटील यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्री. पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसीलदार विरसींग वसावे, ओमकार ओतारी,श्री ठाकूर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक ओळख करुन घेत संवाद साधला.

थोडक्यात परिचय

श्री. अनिल पाटील, भा.प्र.से. (IAS 2012) एम.एस.सी. (ॲग्री) सुवर्ण पदक) एल. एल. बी.

· महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अधिकारी वर्ग 2 म्हणून 1989 ते 1996 पर्यंत विविध पदांवर कामकाज.

· 1996 पासून महसूल विभागात परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू.

· परिविक्षाधीन कालावधीनंतर सिंधुदुर्ग येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत (ऑगस्ट 1998 ते जुलै 1999)

· उपविभागीय अधिकारी अलिबाग म्हणून जुलै 1999 ते मे 2003 पर्यंत कार्यरत

· उपजिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी म्हणून नागरी जमीन कमाल धारणा (मुंबई) कार्यालयात मे 2003 ते जुलै 2008 पर्यंत कार्यरत.
उपनियंत्रक शिधावाटप, मुंबई म्हणून मार्च 2008 ते मे 2011 पर्यंत कार्यरत. शिधापत्रीका नमुणे ऑनलाईन उपलब्ध करुन लोकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला.

· सप्टेंबर 2011 ने जुलै 2016 पर्यंत सिडको महामंडळात प्रतिनियुक्ती, नवी मुंबई व सिडको मालकीचे अतिक्रमीत भुखंडावरील अतिक्रमणे निष्कासनाचे कामकाज व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या जमिनीची भूधारकांच्या संमतीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली.

· जुलै 2016 पासून पदोन्नतीवर अप्पर जिल्हाधिकारी, नंदूरबार या पदावर जानेवारी 2018 पर्यंत कामकाज.

· जानेवारी 2018 पासून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई तसेच ऑगस्ट 2018 पासून व्यवस्थापकीय संचालक, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई म्हणून 30 ऑगस्ट 2021 पर्यंत कामकाज.

· सप्टेंबर 2021 पासुन भारतीय प्रशासकीय अधिकारी पदी निवड (2012 बॅच) होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गोंदिया येथे फेब्रुवारी 2024 पर्यंत कामकाज.

· फेब्रुवारी 2024 पासून व्यवस्थापकीय संचालक, हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ मर्यादीत म्हणून कार्यरत.

· जुलै 2024 पासून व्यवस्थापकी संचालक, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई तसेच आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य म्हणून कार्यरत होते.

ruchira top