Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कमिशनसाठी रेल्वे स्थानकांच सुशोभीकरण !

कमिशनसाठी रेल्वे स्थानकांच सुशोभीकरण !

परशुराम उपरकर यांचा आरोप

सर्वगोड यांना अनिकेत पटवर्धनचा पाठींबा

कुडाळ : रेल्वे स्थानकांचे कितीही सुशोभीकरण केले तरी रेल्वे प्रवाशांना पावसात भिजतच प्लॅटफॉर्मवर उतरावे लागत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर छप्पर करणे खरे महत्वाचे होते. पण केवळ कमिशन खायला मिळावे यासाठी जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार परशुराम ऊपरकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत केला. कार्यकारी अभियंता सर्वगोड याना पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांचा पाठिंबा असल्याचेही श्री. उपरकर म्हणाले. यावेळी राजेश टंगसाळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना परशुराम उपरकर म्हणाले, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पालकमंत्री एकदाच त्या ठिकाणी आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना तक्रार द्यायला सांगून निघून गेले. हा पुतळा उभारणीमागे आणि तो पडण्यामागे सार्वजनिक बांधकाम विभागाचा हात आहे. पुतळा उभारल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त बुधवारी जिल्ह्यात आले. पण त्यांनी भाषणाची सुरुवात भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणेने केली. मात्र येथेही पालकमंत्री रवींद्र चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले. शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारी भारतीय जनता पार्टी आता शिवाजी महाराजांना विसरू लागली आहे हे या कार्यक्रमातून दिसून आले.
रेल्वे स्थानकाचे खालच्या भागाचे सुशोभीकरण करण्यात आले पण प्लॅटफॉर्म तसेच अजून उघडे आहेत. त्यांचे काम अजून झालेले नाही. या सर्व रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर छत उभारण्याची गरज आहे. पुन्हा पावसात प्रवासी भिजतात. त्यामुळे या पावसात भिजणाऱ्या प्रवाशांना या विमानतळाचा लूक असणाऱ्या रेल्वेस्थानकाची गरज नाही. या स्टेशनची मूळ मंजुरी २०-४९ मधून मिळालेली आहे. त्यामध्ये सूचनाफलक, प्रसाधन गृह, पावसापासून अच्छादन आणि एसटीचे थांबे यासाठी मूळ मंजुरी 48 कोटींची देण्यात आलेली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार स्टेशनला ११ कोटीची मंजुरी मिळालेली आहे. पण त्या मंजुरीमध्ये जय डीएसआर मध्ये नमूद नाहीत त्या बाबी, म्हणजे वन्य प्राण्यांचे पुतळे आणि अन्य बाबी बसवण्यात आल्या. असा आरोप श्री. उपरकर यांनी केला आहे.
कुडाळच्या कार्यक्रमात माजी खासदार निलेश राणे म्हणाले, पालकमंत्री यांनी बांधकाम मंत्री झाल्यानंतर २८०० कोटी जिल्ह्यात दिले. मग तो २८०० कोटींचा विकास कुठे गेला आहे शोधण्याची आता खरी गरज निर्माण झाली आहे. पण ते सांगत असताना स्वतःचे वडील जिल्ह्याचे १५ वर्षे पालकमंत्री होते, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री, आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत हे निलेश राणे विसरले. म्हणजे त्यांच्या काळात विकास झाला नाही, हे निलेश राणेंनी स्वतः स्पष्ट केले.
आज अशा प्रकारचे हे काम न करणारे मंत्री फक्त घोषणा करतात. २८०० कोटीचा विकास झाला म्हणून सांगतात. पण दरवर्षी गणपतीला येणारे चाकरमानी हे खड्ड्यातूनच प्रवास करतात. त्याचप्रमाणे याही वर्षी त्या नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करत आपले गाव गाठावे लागत आहे, ही खऱ्या अर्थाने या मतदारांची शोकांतिका आहे आणि म्हणूनच या सर्व स्टेशनचे किती सुशोभीकरण झालं तरी आमचा गोरगरीब नागरिक हा रेल्वेतून पावसात भिजतच प्लॅटफॉर्मवर उतरणार आहे ही वस्तुस्थिती आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर छत उभारण्याचे काम केले असते तर ते पैसे रेल्वेकडे वर्ग करावे लागले असते आणि त्याच्यामध्ये कमिशन मिळाले . नसते. आणि म्हणूनच कमिशनसाठी फक्त ही रेल्वेची स्थानके सुशुभीकरण केली आहेत जे जनतेला प्लॅटफॉर्मवर छत हवे आहे, ते मात्र करण्यात आलेले नाही. याचा अर्थ हे सर्व करण्यामागे जिल्ह्यातले कार्यकारी अभियंता सर्वगोड आहेत. त्या सर्वगोड यांनी जिल्ह्यातल्या चारही रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाची टेंडर काढली आहेत. त्याशिवाय ११ स्टेशनचे आर्किटेक नेमण्यासाठी सुद्धा स्वतः टेंडर काढली आहेत. या सर्व गोष्टीना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांचे पाठबळ आहे. म्हणून अनिकेत पटवर्धन यांनीच सर्वगोड यांना गुन्हा दाखल करायला सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या खिशात बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आणि सर्व अधिकारी आहेत असे उपरकर यांनी आरोप केले आहेत.
एका प्रश्नाच्या उत्तराच्या वेळी श्री. उपरकर पुढे म्हणाले, राजकोट येथील पुतळा प्रकरणी भारतीय जनता पक्ष सध्या बॅकफूटवर केला आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रकरणी माफी मागितलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पण फडणवीस मात्र माफी मागत ननाहीत, पालकमंत्री माफी मागत नाहीत कारण हा पुतळा पडला हे ते स्वीकारत नाहीत. राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या वर्क ऑर्डर मध्ये रकमेचा उल्लेख नाही. पुतळा सहा फुटाचा करायचा असताना तो १८ फुटांचा करण्यात आला. त्याच बरोबर देखभाल दुरुस्तीसाठी या पुतळ्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणार असल्याने त्यांनी पुतळ्याचे काम कमकुवत झाल्याची तक्रार केली असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शेवटी सांगितले.

ruchira top