Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

वैभववाडी-उंबर्डे रस्ता गेला खड्ड्यात...

गणेश चतुर्थीपूर्वी डागडुजी करण्याची मागणी

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा हा कायमच चर्चेचा विषय आहे. पावसाळा आला की, रस्ते खड्ड्यात जातात आणि या चर्चेला उधाण येते. मग सुरू होतो आरोप-प्रत्यारोपांचा खेळ, तो ही सालाबादप्रमाणे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना मामुली मलमपट्टी करुन जनक्षोभ कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या 'बाप्पांचे आगमन' या वर्षीही खड्ड्यातूनच होणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांसह राज्यमार्गावरील खड्डे उखडायला लागले आहेत. भुईबावडा, मांगवली व उंबर्डे ते वैभववाडी यांसह अन्य ग्रामीण रस्त्यांची रस्त्यांची अक्षरशः दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची होतील का? हा प्रश्न खड्यांनाही पडत आहे. दरवर्षी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो, परंतु कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत जाते.

अखंड कोकणवासियांचा सण म्हणजे गणेशोत्सव, अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपल्याने मुंबईहून गावाला येण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने येतात. या काळात रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. शिवाय अवजड वाहनांची संख्या लक्षणिय असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे अधिकच उखडत जातात. उत्सवादरम्यान अवजड वाहनांना 'नो' एंन्ट्री दिल्यास लहान वाहनांना वाहतूकीच्यादृष्टीने सोयीस्कर ठरेल.


गणेशोत्सवादरम्यान मुंबईहून चाकरमान्यांना गावाला येण्यासाठी पनवेल पेन दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीशी सामना करावा लागतो. बहुतांशी गणेशभक्त कोल्हापूरमार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे कोकणात येणारी वाहने भुईबावडा घाटमार्गे येतात. त्यामुळे गणेश भक्तांना याही वर्षी खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. मुळातच रस्त्यांची अभ्यासपूर्ण बांधणी केली जात नाही. किंवा डागडुजी करताना शास्त्रशुद्ध पद्धत अवलंबली जात नाही, तोपर्यंत खड्यांचा सामना करावाच लागणार. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ruchira top