मालवण : स्काय न्यूज टुडे या न्यूज चॅनलच्या आरती संग्रह 2024 चे प्रकाशन तहसीलदार वर्षा झालटे, डॉ. गार्गी ओरसकर, योगिता खोत, सुलभा बिरमोळे, ममता कोळंबकर या स्त्री शक्तींच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात करण्यात आले.
स्काय न्यूज टुडे युट्युब, वेब या माध्यमातून तसेच सोशल मीडिया अन्य प्लॅटफॉर्म माध्यमातून वाचक, दर्शक यांच्याशी जोडला आहे. अनेक Live कार्यक्रम चॅनल माध्यमातून सातत्याने सुरु आहेत. कोकणचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशशोत्सव निमित्ताने एक दर्जेदार आरती संग्रह वाचकांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न स्काय न्यूज टुडे च्या माध्यमातून करण्यात आला आहे. विविध आरती, आरोग्य व आहार विषयक माहिती, यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यावसायिक, उद्योजक, नेतेमंडळी यांच्या शुभेच्छा असा हा आरती संग्रह मोफत स्वरूपात सर्वत्र वितरित केला जात आहे.
आरती संग्रह पाहून अनेकांनी एक चांगल्या दर्जाचा आरती संग्रह बनवण्यात आला असल्याचे सांगत कौतुक केले आहे.

