भाजपा बुथ कमिटी अध्यक्ष संजय सावंत यांनी मानले भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार
मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील बीएसएनएल टॉवर हा मागील काही दिवस बंद स्थितीत होता. सबंधित विभागाकडून देखील दुर्लक्ष केले जात होते. असरोंडी गावातील भाजपा बुथ कमिटी अध्यक्ष संजय सावंत यांनी माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले. महेंद्र चव्हाण यांनी याबाबत थेट भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधत समस्या मांडली. दरम्यान याबाबत तात्काळ कार्यवाही होऊन बंद असलेला टॉवर अखेर सुरू करण्यात आला. बंद बीएसएनएल टॉवर सुरु झाल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

