Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

राजकोट येथील शिवछत्रपती पुतळा दुर्घटना पाहणी दौरे आता थांबवा…

राजकोट येथील शिवछत्रपती पुतळा दुर्घटना पाहणी दौरे आता थांबवा…

महाराजांच्या पुतळ्याच्या पुनर्बांधणीवर लक्ष केंद्रित करावे ; रविकिरण तोरसकर

मालवण : मालवण राजकोट येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याबाबत दुर्घटना घडली. यामुळे राज्यातच नव्हे तर देशात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये सर्वपक्षीय उच्च स्तरीय नेत्यांनी मालवण राजकोट येथे भेट देऊन पाहणी केली आहे. त्याचबरोबर संबंधित विषयात महाराष्ट्र शासनाने दुर्घटना आणि पुनर्बांधणी या संदर्भात दोन समित्या नियुक्त केल्या आहेत. तसेच नौदलाने पण स्ट्रक्चरल ऑडिट आपल्या फॉरेन्सिक विभागातर्फे सुरू केले आहे. गेल्या सहा दिवसात विविध नेत्यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यामध्ये काही संघर्षाचे क्षण पण अनुभवास मिळाले. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त राजकोट परिसर व शहराच्या काही भागात प्रशासनाने नियुक्त केला आहे.

एक शिवप्रेमी आणि मालवणवासीय म्हणून शिवछत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेबाबत जेवढी खंत व्यक्त करावी तेवढी कमी आहे. परंतु सर्वपक्षीय उच्चस्तरीय नेत्यांच्या सततच्या पहाणी दौऱ्यामुळे आगामी गणेशोत्सव, वाहतूक कोंडी तसेच पर्यटन व मासेमारी व्यवसाय यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मालवण मधील परिस्थिती ही तणावग्रस्त आहे अशा प्रकारचे संदेश लोकांपर्यंत जात आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळातील मंगलमय वातावरण, तसेच आगामी पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वपक्षीय सर्व संघटनांच्या नेत्यांना विनंती आहे, की कृपया त्यांनी हे पाहणी दौरे थांबवून महाराजांच्या पुतळ्याच्या पुनर्बांधणीवर लक्ष केंद्रित करावे अशी भूमिका रविकिरण तोरसकर यांनी मांडली आहे.

स्थानिक पक्षीय कार्यकर्त्यांनी पण कोणत्याही प्रकारचे आंदोलन गणेश चतुर्थी च्या २१ दिवसापर्यंत होऊ नये याची काळजी घ्यावी.असे सर्वसामान्य नागरिक म्हणून आवाहन करीत आहे, असे देखील तोरसकर यांनी म्हटले आहे.

ruchira top