भाऊ भोगले | बागायत : रोटरी क्लब मुंबई (माहीम) यांच्यामार्फत दहावीच्या 13 विद्यार्थ्यांना व 4 शिक्षकांना मोबाईल व संगणक द्वारे वापरण्याचे सॉफ्टवेअर देण्यात आले.रोटरी क्लबच्या सदस्या व समन्वयक श्रीमती रश्मी पाटील मॅडम यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आले.
या सॉफ्टवेअर मध्ये अभ्यासक्रमाबरोबर करियर गायडन्स सुद्धा आहे."आयडियल गुरु "यामध्ये आत्मसन्मान आणि आत्मविश्वास,ध्येय निश्चिती व वेळेचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक प्रकरणावर आधारित प्रश्नोत्तरे, कृतीपत्रिका, व्हिडिओ यांचा समावेश आहे नोट्स, स्वाध्याय, महत्त्वाचे प्रश्न, कृतीपत्रिका व एम. सी. क्यू. या विविध टप्प्याद्वारे विषय सोपा केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करून आपल्या रिकाम्या वेळेत आवडीने शिकता येईल असे मार्गदर्शन श्रीमती रश्मी पाटील मॅडम यांनी केले.ग्रामीण भागातील विद्यार्थी नवीन तंत्रज्ञानापासून वंचित राहू नये, यासाठी रोटरी क्लब मुंबई माहीम यांनी सॉफ्टवेअर प्रदान केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका कुमारी प्रतिभा केळुसकर या उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटकर,ऑन. जनरल सेक्रेटरी श्री साबाजी करलकर व कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष श्री सुधीर हेरेकर यांनी आभार व्यक्त केले .

