Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

घुमडाई मंदिरातील "श्रावणधारा" महोत्सवाचा आज समारोप ; जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

दुपारी मंदिरात महाप्रसाद तर सायंकाळी "चिंतामणी जन्म" संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग

मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे येथे श्रावण मासानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुमडे ग्रामस्थ मंडळ "श्रावणधारा" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृती प्रित्यर्थ नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा घुमडाई मंदिरात संपन्न झाली. या श्रावणधारा महोत्सवाचा समारोप आज मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. सायंकाळी ५ वा. मान्यवरांच्या हस्ते भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

श्रावण मंगळवार निमित्त घुमडाई मंदिरात गेले महिनाभर श्रावणधारा महोत्सव संपन्न झाला. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात घेण्यात आले. तर भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृती प्रित्यर्थ नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचा समारोप आज होणार आहे. मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार असून सायंकाळी ७ वाजता "चिंतामणी जन्म" हा संयुक्त दशावताराचा महान पौराणिक संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांचा भरणा आहे. तरी श्री देवी घुमडाई मंदिरात होणाऱ्या या मंगल धार्मिक सोहळ्यास भाविक व भजन श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top