शिवसेना (उबाठा) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका
मालवण : महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोडे मारो आंदोलन महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. भाजपा आणि शिंदे गटाकडून काही ठिकाणी उत्तर आंदोलने स्टंट होताना दिसत आहेत. खरंतर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेला भ्रष्टाचार, महिलांवर होणारे अत्याचार, वाढलेली बेरोजगारी आणि महागाई यावरून जनतेचा लक्ष विचलित करण्यासाठी महायुतीचे मोठे षडयंत्र आहे. असा आरोप शिवसेना ( उबाठा) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.
महाविकास आघाडी जोडो मारो आंदोलनकर्ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडताना दिसत आहे हे आज भारतीय जनता पार्टीचे नेते यांना कुठेतरी खुफतय आणि त्याचमुळे जनतेचा लक्ष विचलित करण्यासाठी ही कृती महायुतीकडून होताना या ठिकाणी दिसून येत आहे.
अजून किती वेळा तुम्ही महाराजांचा अपमान करणार? आज पुतळ्याच्या भोवतालच्या बांधकामांमध्ये भ्रष्टाचार असो अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण आज भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसतेय. त्यामुळे जनतेच्या डोळ्यांमध्ये धुळ फेकण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी निश्चितपणे करू नये अन्यथा महाविकास आघाडी नव्हे तर जनताच या ठिकाणी रस्त्यावर उतरून तुमचा बिमोड करताना या ठिकाणी दिसेल आणि हे चित्र येणाऱ्या थोड्या दिवसात तुम्हाला दिसून येईल. भाजपा शिंदे गटाकडून होणारी आंदोलन ही जनतेचा लक्ष विचलित करणारे आंदोलन म्हणून त्याला भ्रष्टाचार बचाव आंदोलन, जनता का आवाज दबाव हे नाव ठेवावे लागेल, असे देखील खोबरेकर यांनी म्हटले आहे.

