Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

प्रक्षोभक भाषण प्रकरणी आम. भास्कर जाधव यांना जामीन

प्रक्षोभक भाषण प्रकरणी आम. भास्कर जाधव यांना जामीन

दोन वर्षांपूर्वीचा गुन्हा

कुडाळ : प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांना ७ हजार ५०० रुपयाचा जामीन कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी समीर कुलकर्णी यांनी मंजूर केला. सोमवारी भास्कर जाधव कुडाळ न्यायालयात हजर झाले.

अँन्टी करप्शनने आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेसंदर्भात चौकशी नोटीस काढल्यानंतर शिवसेना उबाठासह महाविकास आघाडीने कुडाळ येथील अँटी करप्शन कार्यालयावर १८ ऑक्टोबर २०२२ रोजी धडक मोर्चा काढला होता. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी प्रशोभक भाषण केले होते. त्यांच्यावर वैयक्तिक तसेच सामूहिक १५ जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


याप्रकरणी श्री जाधव यांच्यासह संजय पडते, सतीश सावंत, रुपेश पावसकर, जान्हवी सावंत, अमित सामंत, व अन्य आज कुडाळ न्यायालयात हजर झाले. त्यांना प्रत्येकी ₹ ७,५००/- चा जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी न्यायालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण पाच राजकीय केसेस मधील संशयीतांच्या आज कोर्टात तारखा होत्या.


अँटी करप्शन कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी झालेल्या सभेच्या वेळी आमदार भास्कर जाधव यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर एक गुन्हा दाखल केला होता. तसेच मोर्चा काढल्याने खासदार अरविंद सावंत यांच्यासह भास्कर जाधव, अरुण दुधवडकर , संजय पडते, राजन शिवराम नाईक, गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर आत्माराम उर्फ अतुल बंगे, संदेश पारकर जान्हवी सावंत, अमित सामंत, इर्शाद शेख, अभय शिरसाट, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी काहीजण आज न्यायालयात हजर झाले. यांच्या वतीने ऍड. सुधीर राऊळ, ऍड. हीतेश कुडाळकर यानी काम पाहिले.


दरम्यान पेट्रोल दरवाढ आंदोलन, कुडाळ नगरपंचायत येथे झालेल्या वादाच्या गुन्ह्यातील संशयीताचीही केस होती. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यासह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

ruchira top