प्रभाकर माने यांचा होरपळून मृत्यू
भाऊ भोगले | बागायत : बागायत मसुरे मर्डेवाडी येथील प्रभाकर माने यांच्या घराला दुपारी अचानक लागून प्रभाकर माने यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नी मसुरे आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्या आहेत. आगीने रौद्र रूप धारण केल्याने घर जळून खाक झाले आहे यामध्ये घरातील साहित्यही जळून खाक झाले आहे.
प्रभाकर माने व त्यांच्या पत्नी या आज सकाळीच मुंबईवरून गावी गणेश चतुर्थीच्या साफसफाईसाठी आले होते सकाळपासून त्यांनी साफसफाई करून दुपारी विश्रांतीसाठी घरातच खुर्चीत बसलेले असताना अचानक आग लागल्याने ते दोघेही वयोवृद्ध असल्याने त्यांना काहीच समजायच्या आत आगीने रौद्र रूप धारण केले होते त्यामध्ये प्रभाकर माने हे काहीच हालचाल करू शकले नाहीत व त्यांच्या वयानुसार त्यांना जमले नाही मात्र त्यांच्या पत्नी घराच्या बाहेर पडण्यासाठी निघाले असता घाईगडबडीत त्या घसरून पडल्या त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांनी बाहेर येऊन शेजाऱ्यांना आरडाओरडा करून सांगितल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला तोपर्यंत शेजाऱ्यांना घरातून धूर येताना दिसत होता मात्र साफसफाई करत असल्यामुळे धूर असल्याचा अंदाज बांधून शेजाऱ्याने दुर्लक्ष केले मात्र जेव्हा आगीने भडका घेतला तेव्हा शेजारी गावात आले मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या बक्षस्थानी होते त्यात घराच्या खिडक्या व दरवाजे बंद असल्यामुळे संपूर्ण घरात धुराचे साम्राज्य होते



स्थानिक आणि तसेच राजकीय पुढार्याने तात्काळ मालवण अग्निशमन दलाला प्राचारण केले मात्र समोरून अपेक्षित उत्तर न मिळता होणाऱ्या जबाबदार कोण अशी उलट सुलट उत्तरे मिळाली व अग्निशमन दल येण्यास फार विलंब झाला आणि उरलेसुरले संपूर्ण घर आगीच्या भाक्षस्थानी आले जमलेल्या सर्वांनी सांगितले संपूर्ण गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे .
यावेळी मर्डे गावचे उपसरपंच श्री राजेश गावकर यांनी अग्निशमन दलाच्या पाईप वर ताबा मिळवत घरातील आग आटोक्यात आणण्यास लाख मोलाचेकाम केले आह.संपूर्ण घराला लाकडी सामान असल्याने आग आटोक्यात आणण्यास शर्तीचे प्रयत्न करावे लागले .सध्या आग आटोक्यात आली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे बोलले जात आहे

