मठबुद्रुक विविध कार्यकारणी सोसायटीमध्ये सीएससी सेंटरचे चेअरमन सतीश परुळेकर यांच्या हस्ते लोकार्पण
शेतकरी ग्रामस्थ यांचा अन्य ठिकाणाचा फेरा वाचणार
मालवण : मठबुद्रुक या ग्रामीण भागात सीएससी सेंटरला मंजुरी मिळाल्यामुळे मठ, निरोम आणि बुधवळे या तिन्ही गावांमध्ये अधिक सेवा सुविधा उपलब्ध होऊन, शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरणा, सातबारा काढणे, आधार नोंदणी व लिंक यांसह रेल्वे तिकीट आरक्षण व अन्य ऑनलाईन सेवा सुविधा सोसायटी मार्फत मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अन्य ठिकाणी जाण्याच्या फेऱ्या वाचणार आहेत. एकूणच आपले सरकार सेवा केंद्र माध्यमातून मिळणाऱ्या सर्व ऑनलाईन सेवा, सर्व शासकीय, खाजगी सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
भविष्यात मिनी एटीएम मशीन सुविधा, सोसायटीची भव्य इमारत, गॅस सिलेंडर उपलब्ध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नाशील असल्याचा विश्वास चेअरमन सतीश परुळेकर यांनी व्यक्त केला.
मठ बुद्रुक विविध कार्यकारणी सोसायटीमध्ये सीएससी सेंटरला मंजुरी मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शहा, जेष्ठ नेते खा. नारायण राणे, भाजपा नेते माजी खा. निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे चेअरमन सतीश परुळेकर यांनी संस्था शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहेत.
यावेळी व्हाईस चेअरमन बाळा येरम, मठ बुद्रुक सरपंच मोहन वेंगुर्लेकर, निरोम सरपंच राजू राऊत, माजी चेअरमन बाबा घाडी, बी.डी. कांबळी, दीपक सावंत, संचालक जनार्दन सावंत, उमाजी मालप, श्री जंगले, अशोक कांदळकर, भानुदास येरम, बाबा घाडी, ग्रामपंचायत सदस्य उदय सावंत, सेक्रेटरी श्री कदम, पोलीस पाटील संदीप बुधवळेकर, सूर्यकांत घाडी, संस्थेचे सभासद प्रमोद कदम उत्तम मल्हार , गुरुदास घाडी, अमित बुधवळेकर, बाळकृष्ण सुतार, आबा गायतोंडे, निकिता चव्हाण, सौ. आचरेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थेचे सेक्रेटरी श्री कदम यांनी आभार मानले.

