Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 1 सप्टेंबर रोजी मालवणला

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्या दुर्घटना स्थळाची करणार पाहणी

मालवण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना जिथे घडली, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्याला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले रविवार दि.1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता भेट देऊन दुर्घटना स्थळाची पाहणी करणार आहेत.

मालवण च्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्याचे कळताच ना.रामदास आठवले यांनी या दुर्घटनेचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची ही मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्यामुळे सर्वांच्याच भावना दुखावल्या आहेत.मात्र यातून धडा घेऊन राज्य सरकार ने अधिक सुरक्षेची काळजी घेऊन नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा त्याच ठिकाणी राजकोट किल्ल्यावर उभारला पाहिजे.अशी आपली मागणी असून यासाठी ना.रामदास आठवले उद्या रविवारी दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता मालवण मधील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत. अशी माहिती हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.

ruchira top