Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

भाजप-सेनेच्या दहीहंडीचा कुडाळ मध्ये रंगणार थरार

अंकुश चौधरी, समीर चौघुले, सई ताम्हणकर राहणार उपस्थित

महिला आणि बालगोपाळसह एकूण २८ गोविंदा पथकांचा समावेश

कुडाळ : भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत कोकणातील सर्वात मोठी दहीहंडी असलेला उत्सव उद्या शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी कुडाळच्या एसटी डेपोच्या मैदानावर साजरा केला जाणार आहे. त्यासाठी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्वशी, हास्यजत्रा फेम समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, गौरव मोरे, तसेच इतर अनेक नामवंत कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला माजी खासदार आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे कुडाळ तालुका अध्यक्ष दादा साईल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना दादा साईल म्हणाले, की यंदाचा या दहीहंडी उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे ५ लाख ५५ हजार ५५५ रक्कम असलेली ही दहीहंडी कोकणातली सर्वात मोठी दहीहंडी मानली जाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख निलेश राणे यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षीपासून हा दहीहंडी उत्सव कुडाळमध्ये साजरा होत आहे. पण यंदाच्या या दहीहंडी उत्सवाला संवेदनशीलतेचि झालर आहे. मालवण येथील पुतळा दुर्घटनेनंतर नारायण राणे आणि निलेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा दहीहंडी उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. सध्या जिल्ह्यातली परिस्थिती पाहता जरी या दहीहंडी उत्सवाला बॉलिवूडचे कलाकार हजर राहणार असले तरी या ठिकाणी बॉलीवूड नृत्य वगैरे सादर होणार नाहीत. तर त्या ऐवजी देशभक्तीपर गीते, पोवाडे सादर केले जातील आणि एक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम म्हणून हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे असे दादा साईल यांनी सांगितले.
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सहा ते आठ नामांकित कलाकार या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये उर्वशी ही नामांकित अभिनेत्री, सिने अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री सई ताम्हणकर, हास्य जत्रा फेम समीर चौगुले, प्रियदर्शनी इंदलकर, गौरव मोरे हे कलाकार या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. आतापर्यंत या दहीहंडी उत्सवासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २८ गोविंदा पथकानी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये महिलांचे गोविंदा पथक, तसेच लहान मुलांचे गोविंदा पथक देखील असणार आहे. हे सर्व संघ चित्तधारक असे मनोरे आणि त्याची प्रात्यक्षिके या दहीहंडी उत्सवात सादर करणार आहेत. त्याचबरोबर निलेश राणे यांची संपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे असे दादा साईल यांनी सांगितले.
यावेळी संजय वेंगुर्लेकर, अभय परब, पप्या तवटे, विनायक राणे, आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, बाळा पावसकर,विजय कांबळी उपस्थित होते.

ruchira top