मालवण : मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत हे मालवण मध्ये येणार आहेत.शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी येणार असून त्यांचा नियोजित दौरा आहे.
संजय राऊत सकाळी दहा वाजता चीपी विमानतळ येथे येणार आहे. त्यानंतर १०:३० वाजता मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता कोळंब येथे समर्थ मंगल कार्यालय येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ४ वाजता मालवण शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमी, शिवसेना (उबाठा), युवा सेना आणि महिला, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नेते संदेश पारकर आणि जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.

