Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

राजकोट दंगा प्रकरण | ४२ जणांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल

मालवण | प्रतिनिधी : राजकोट येथील दंगा प्रकरणी मालवण पोलिसांनी ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

राजकोट किल्ला येथे भाजपा व ठाकरे गट पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या दंगा दरम्यान पोलीस कर्मचारी संभाजी पाटील, मेहेक परब हे जखमी झाले. त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेही जखमी झाले.

त्यामुळे या राड्याप्रकरणी गर्दी, मारामारी, घोषणाबाजी, शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, दुखापत करणे, जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमानुसार दोन्ही गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे हे अधिक तपास करत आहेत.

ruchira top