Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार सौ.श्रद्धा कदम यांना प्रदान

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कोल्हापुर येथील राज्य अधिवेशनात केले सन्मानित

वैभववाडी | प्रतिनिधी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने दिला जाणारा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२४ यावर्षी कणकवलीच्या सौ.श्रद्धा कदम यांना देऊन सन्मानित करण्यात आले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अधिवेशन कोल्हापुर येथे दिनांक २४ व २५ ऑगस्ट रोजी संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
ग्राहक केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने ग्राहक संघटन, ग्राहकाचे प्रबोधन आणि ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य केले जाते.

महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यात संस्थेचे कार्य सुरू असून कार्यकर्त्याचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी राज्य अधिवेशनाचे आयोजन केले जाते. कोल्हापूर येथील अधिवेशनात कोकण विभागाचा
'उत्कृष्ट कार्यकर्ता' पुरस्कार-२०२४" ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली तालुका शाखेच्या अध्यक्षा सौ.श्रद्धा कदम यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. श्रद्धा कदम यांनी मागील वर्षभरामध्ये केलेल्या ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहक मार्गदर्शन तसेच सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
याबद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे राज्यसचिव श्री.अरुण वाघमारे, संघटक श्री.सर्जेराव जाधव, सहसंघटिका सौ. मेधाताई कुलकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व राज्य सहसचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील, कोषाध्यक्षा सौ.सुनीता राजेघाडगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.बी.जे.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ruchira top