Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

व्यापारी बांधव व नागरिकांचे आभार

व्यापारी बांधव व नागरिकांचे आभार

युवा व्यापारी मंदार ओरसकर यांनी मानले आभार

मालवण : मालवण व्यापार क्षेत्रातील व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, रिक्षा व्यावसायिक व पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक यांनी निषेध नोंदविण्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले. तसेच मालवण वासियांनी या मोर्चात सहभागी होऊन एकजूट दाखली. या सर्वांचे युवा व्यापारी मंदार ओरसकर यांनी आभार मानले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष असलेला किल्ले सिंधुदुर्ग स्थापत्य शास्त्राचा आदर्श आहे. मालवणच्या जडणघाडणीत किल्ले सिंधुदुर्गचे स्थान शिखरावर आहे. मालवणाचे पर्यटन गेल्या काही वर्षात फार मोठया प्रमाणात वाढत असून पर्यटनाचा केंद्रबिंदू किल्ले सिंधुदुर्ग आहे. या सोबत गतवर्षी किल्ले राजकोट येथे उभारणी झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवणच्या ऐतिहासिक पर्यटनात अभिमानास्पद भर ठरावी असा ठरला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांसाठी दैवत आहेत. असे असताना महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना तमाम शिवप्रेमींसाठी दुःखदायक वेदनादाई आहे. मालवणवासियांना हा धक्का आहे. मालवणच्या पर्यटनाचे नाव ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जागतिक स्तरावर पोहचले त्या महाराजांचा पुतळा मालवण भूमीतच कोसळतो ही घटना दुर्दैवी ठरली. दोषींवर कारवाई होईल, मात्र या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया या मंदार ओरसकर यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रामुख्याने मालवण व्यापार क्षेत्रातील व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, रिक्षा व्यावसायिक व पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक यांनी निषेध नोंदविण्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले. तसेच मालवण वासियांनी या मोर्चात सहभागी होऊन एकजूट दाखली. या सर्वांचे युवा व्यापारी मंदार ओरसकर यांनी आभार मानले.

ruchira top