Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सचिन तळेकर यांना श्रमिक पंचप्राण पुरस्कार प्रदान

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कोल्हापुर येथील राज्य अधिवेशनात केले सन्मानित

वैभववाडी | प्रतिनिधी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने दिला जाणारा "श्रमिक पुरस्कार-२०२४" यावर्षी कोकण विभागातून श्री. सचिन तळेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अधिवेशन कसबा बावडा, कोल्हापुर येथे दिनांक २४ व २५ ऑगस्ट रोजी संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.


ग्राहक केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असलेल्या शेतकरी, व्यापारी, उद्योजक, श्रमिक आणि ग्राहक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी कोकण विभागातून श्रमिक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. यामधून वैभववाडी तालुक्यातील सोनाळी गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते, वैभववाडी तालुका रिक्षा संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच जिल्हा रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष या पदांवर कार्यरत आहेत.


ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने ग्राहक संघटन, ग्राहकाचे प्रबोधन आणि ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य केले जाते. महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यात संस्थेचे कार्य सुरू असून कार्यकर्त्याचे प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी राज्य अधिवेशनाचे आयोजन केले जाते. यावेळी समाजातील अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असलेल्या घटकांचा पंचप्राण पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.श्री. सचिन तळेकर यांनी वैभववाडी तालुका रिक्षा चालक- मालकांचे संघटन, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व रिक्षा प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा केलेला प्रयत्न आदी कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.


याबद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉ.प्रवीण खोत, महावितरण कोल्हापूरचे मुख्य अभियंता श्री.स्वप्निल काटकर, पुणे महावितरणचे मुख्य अभियंता श्री.राजेंद्र पवार
संस्थेचे राज्यसचिव श्री.अरुण वाघमारे, संघटक श्री.सर्जेराव जाधव, सहसंघटिका सौ. मेधाताई कुलकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व राज्य सहसचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील, कोषाध्यक्षा सौ.सुनीता राजेघाडगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.बी.जे.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ruchira top