Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

शांततेचे आवाहन ; निषेध मोर्चात कायदा सुव्यवस्था याचे पालन व्हावे

शांततेचे आवाहन ; निषेध मोर्चात कायदा सुव्यवस्था याचे पालन व्हावे

मालवणात दंगल नियंत्रण पथकांसह पोलिसांचा फौजफाटा तैनात

मालवण : राजकोट किल्ला येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज शहरात निषेध मोर्चा होणार आहे. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा सुव्यवस्था याचे पालन व्हावे या दृष्टिकोनातून संबंधितांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी विजय कांबळे, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली दोन दंगल नियंत्रण पथक, 17 अधिकारी तसेच 57 अंमलदार असा कडेकोट पोलीस बंदोबस्त मालवण शहरात तैनात करण्यात आला आहे. मालवण शहरात काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चात शांततेचे तसेच जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात होणाऱ्या उपोषण, मोर्चा, संप, निदर्शने, रास्ता रोको यांसारख्या प्रकारामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत मनाई आदेश लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर निषेध मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला सण असे उत्सव साजरा करण्यात येत आहेत. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यापूर्वी राज्यात उत्सवाच्या कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्यामुळे राज्यातून विविध राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झाल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यातून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण आंदोलने करत आहेत तसेच सोशल मीडियावर समाजकंटकांकडून धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह पोस्ट व व्हिडिओ प्रसारित करून विविध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचेही पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. यातच राजकोट किल्ला येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज शहरात निषेध मोर्चा होणार आहे. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा सुव्यवस्था याचे पालन व्हावे या दृष्टिकोनातून संबंधितांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन श्री. कोल्हे यांनी केले आहे.

ruchira top