मालवण : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवणात वेदनादायी घटना घडली. तमाम शिवप्रेमींच्या भावनांचा खेळ मांडणाऱ्याना वेळीच ठेचले पाहिजे. सर्व जनतेने एकत्रितपणे या घटनेचा निषेध करणे क्रमा प्राप्त आहे. आपल्या देशाला देखील या घटनेची वेदना आज झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच उठा सज्ज व्हा आणि या घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांनाच पदावरून हटवूया. अशी भुमिका शिवसेना ठाकरे गट युवती सेना अधिकारी निनाक्षी शिंदे यांनी मांडली आहे.
अरबी समुद्रात डौलाने उभा असलेला किल्ले सिंधुदुर्ग महाराजानी 350 वर्षा पूर्वी उभराला. आजही त्याच दिमाखात उभा आहे. हा आदर्श राज्यकर्ते यांनी घ्यावा हीच अपेक्षा.

