सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालय तोडफोड प्रकरण
मालवण : आमदार वैभव नाईक यांसह शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या नंतर आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात तोडफोड केली होती. या प्रकरणी आमदार नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. यशवंते हे अधिक तपास करत आहेत.

