लायन्स क्लब ऑफ मालवण आणि रेडकर हॉस्पिटल मालवण यांच्या वतीने कॅम्पचे आयोजन
मालवण : लायन्स क्लब ऑफ मालवण आणि रेडकर हॉस्पिटल मालवण यांच्या संयुक्त विद्यमानाने घरेलू कामगार, बांधकाम कामगार, नगरपालिका स्वछता कामगार यांच्यासाठी धनुर्वात इंजेक्शनचा कॅम्प घेण्यात आला. यावेळी 50 कामगारांनी याचा लाभ घेतला.
यावेळी लायन्स क्लब चे अध्यक्ष ला. महेश अंधारी, सेक्रेटरी ला.फेणी फर्नाडीस , खजिनदार ला.पल्लवी खानोलकर ,ला. विश्वास गावकर, ला. उमेश शिरोडकर, ला. डॉ. दर्शन खानोलकर, ला.मेघशाम शँकरदास , ला. सौ. जयश्री हडकर, ला. सौ. दिक्षा गावकर, ला.सौ. रूपा कांदळकर , श्री. नरहरी खानोलकर आणि रेडकर हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होते.
कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची ही माहिती डॉ. ला.दर्शन खानोलकर यांनी दिली.

