Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

राजे खरंतर आमचंच चुकले..

राजे खरंतर आमचंच चुकले..

राजकीय, प्रशासकीय, कंत्राटदार किंवा इतर संबंधित व्यक्ती यांच्यावर अवलंबून राहिलो आणि घात झाला : रविकिरण तोरसकर

मालवण : राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळाबाबत घडलेल्या घटनेमध्ये आपली सर्वांची चूक आहे, आपण राजकीय, प्रशासकीय, कंत्राटदार किंवा इतर संबंधित व्यक्ती यांच्यावर अवलंबून न राहता स्वतः लक्ष द्यायला हवे होते ,अशी भूमिका रविकिरण तोसरकर यांनी घेतली आहे.

तोरसकर यांनी म्हटले आहे की, आमचे दैवत असलेल्या पुतळा,३५८ वर्षे समुद्रात झुंज देणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर धारातीर्थी पडला. एकाच वेळी मनात प्रचंड वेदना आणि संपूर्ण सिस्टीम बद्दल प्रचंड राग दाटून आला. खरंतर तुम्ही उभारलेल्या आणि राखलेल्या या स्वराज्याचा छोटासा सेवक होण्याची संधी आम्हा मालवण वासियांना सिंधुदुर्ग किल्ल्याची साफसफाई,पुनर्बांधणी यातील सहभागाच्या निमित्ताने मिळाली.

गेल्या वर्षभरात मोरयाचा धोंडा ,सिंधुदुर्ग किल्ल्याची डागडुजी ,शिवराजेश्वर मंदिर पुनर्बांधणी, तसेच राजकोट किल्ला पुनर्बांधणी आणि त्यामध्ये उभा झालेला तुमचा पुतळा या निमित्ताने खरोखरच आमची वाटचाल योग्य दिशेने आहे असं वाटत होते पण इथेच आम्ही चुकलो.संबंधित यंत्रणा मग ती राजकीय, प्रशासकीय, कंत्राटदार किंवा इतर संबंधित व्यक्ती यांच्यावर पूर्णपणे विसंबून राहिलो आणि घात झाला.


यंत्रणेने उभारलेल्या तुमच्या पुतळ्याची जबाबदारी जेवढी त्यांची होती, तेवढीच आमची पण होती. जसं एखाद्या देवळात किंवा देव्हाऱ्यात आपण देवाला दररोज न्हाऊ धुऊ घालतो आणि मग पूजा करतो, तस आम्ही तुमच्या पुतळ्याची देखभाल वाटून घ्यायला पाहिजे होती. जेणेकरून तुमच्या पुतळ्यावर आणि त्यात घडणाऱ्या बदलांवर आमचे बारीक लक्ष राहिले असते आणि हा प्रसंग आम्हाला बघायला लागला नसता, खरंच आम्ही चुकलो .क्षमा असावी राजे अशी भूमिका रविकिरण तोरसकर यांनी मांडली आहे.

ruchira top