Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

किल्ले राजकोट येथील दुर्घटनेसाठी कारणीभूत असणाऱ्यांना शिवप्रेमी माफी देणार नाहीत ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण

शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्यावर गुन्हे दाखल

मालवण : राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला ही घटना अतिशय गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हा पुतळा उभारण्याची संपूर्ण प्रक्रिया ही नौदलाच्या अखत्यारीत झाली आहे. हा पुतळा उभारण्याचे काम हे कंत्राटदार जयदीप आपटे यांच्या आर्टिस्टरी या कंपनीला देण्यात आले होते. डायनॅमिक स्ट्रक्चरचे डॉ. चेतन एस पाटील हे या कामाचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट होते. या कामाची वर्क ऑर्डर देखील नौदलाकडूनच देण्यात आली होती. केवळ ८ महिन्यांमध्ये अशी दुर्घटना घडत असेल, तर त्याला शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट हीच मंडळी जबाबदार आहेत. असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

समुद्रकिनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा जॉइंट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नट बोल्टला गंज पकडला होता. यातूनच ही दुर्घटना घडली असावी, असं प्राथमिक अंदाजातून समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच यासंदर्भातील एक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला दिले होते.

तरीही घडलेल्या दुर्घटनेमुळे आम्हा सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील दोषींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. कुठलाही शिवप्रेमी या दुर्घटनेसाठी कारणीभूत असणाऱ्यांना माफी देणार नाही!

तसेच शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेत लवकरात लवकर याठिकाणी पुतळा उभारण्यात येईल, अशी ग्वाही देतो, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अन्य उपस्थित होते.

ruchira top