Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे क्लेशदायक - इर्शाद शेख

सिंधुदुर्ग : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही फार दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे. त्यामुळे यात दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.


इर्शाद शेख यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची अस्मिता नाहीतर महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची अस्मिता आहे. या अस्मितेचा अशा प्रकारे अपमान करणे ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. डिसेंबर 2023 मध्ये या पुतळ्याच बांधकाम झालं होते. आठ महिन्याच्या आत हा पुतळा कोसळला. त्यामुळे याचे बांधकाम किती तकलादू होते, हे दिसून येते. त्यामुळे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आज आपण पाहतो शिवाजी महाराजांवर आस्था नसणारे लोक, शिवाजी महाराजांचा आपल्या फायद्यासाठी आपल्या चमकेगिरीसाठी इव्हेंट करतात आणि तो इव्हेंट करून आपली पोळी भाजून घेतात. अशा लोकांना शिवाजी महाराजांबद्दल कुठल्याही प्रकारची आस्था नसते, असे लोक फक्त शिवाजी महाराजांचा उपयोग करून घेतात. हे आपल्याला या घटनेतून दिसून आलेले आहे. म्हणून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे. शिवाजी महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणे हे माझ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमी व्यक्तीला फार क्लेश करणार आहे. तसेच अशा प्रकारची दुर्दैवी घटना भविष्यात घडू नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी व्यक्त केली आहे.

ruchira top