Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

हिंदूंना संघटित व्हावेच लागेल !

विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सह मंत्री अनिरुद्ध भावे यांचे प्रतिपादन

मालवणात हिंदू एकता मेळावां संपन्न ; विश्व हिंदू परिषदेचे आयोजन

मालवण : आज हिंदू धर्म एका मोठ्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. आपले अस्तित्व जपण्यासाठी हिंदू धर्म अनेक आव्हानांना सामोरा जात आहे. अनेक ठिकाणी हिंदू धर्मीय धार्मिक संकटाना तोंड देत आहेत. अत्याचाराला बळी पडत आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर येणाऱ्या काळात हिंदूंना संघटित व्हावेच लागेल, त्यांना आपली शक्ती दाखवावी लागेल. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सह मंत्री अनिरुद्ध भावे यांनी केले. जानकी मंगल कार्यालय, कुंभारमाठ येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित हिंदू एकता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष दिघे, प्रमुख पाहुणे रमेश चव्हाण गुरुजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सर संघ प्रचारक ऍड. समीर गवाणकर, बजरंग दल प्रखंड प्रमुख श्रीराज बादेकर, सिंधुदुर्ग जिल्हा सत्संग संचालक उदय गावडे, प्रखंड प्रमुख भाऊ सामंत, विलास हडकर, विश्व हिंदू परिषदेचे संदीप बोडवे, हरेश फडते, डॉ. अजित लिमये, महेश कांदळगावकर, बाबा मोंडकर, भगवान लुडबे, संतोष लुडबे, अविनाश सामंत, डॉ. राहुल पंत वालावलकर, विकी तोरसकर, बाळासाहेब पंत वालावलकर, सनातनचे दीनानाथ गावडे, छोटू सावजी, धनाजी भगत, दादा वेंगुर्लेकर, बबन परुळेकर, विनोद सांडव, राजन गांवकर, उमेश सावंत, तारका चव्हाण, झुंझार हरमलकर, प्रदीप मुंबरकर, सुधाकर दूधवडकर, वारकरी संप्रदाय यांसह अन्य मान्यवर पदाधिकारी बांधव उपस्थित होते.

अनिरुद्ध भावे पुढे म्हणाले, जगातील सगळ्या हिंदूंचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आज पासून बरोबर साठ वर्षांपूर्वी संत महंतांच्या उपस्थितीत, त्यांच्या आशीर्वादाने विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. त्या नंतर देशात जेव्हा जेव्हा हिंदुत्त्वाला मारक परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा विश्व हिंदू परिषदेने आपले दायित्व निभावले आहे. जाता, पात विसरून समस्त हिदू समाज संघटित व्हावा यासाठी विश्व हिंदू परिषद काम करत आहे. अनेक परधर्मियांच्या धोक्यांची हिंदू धर्मियांना जाणीव करून देण्यासाठी हे संमेलन असल्याचेही भावे म्हणाले.

प्रास्ताविकात ऍड. समीर गव्हाणकर म्हणाले, देशात आणि देशाच्या बाहेर अनेक ठिकाणी हिंदू धर्मीय झपाट्याने अल्पसंख्यांक होत चालले आहेत, इतिहासाकडे नजर टाकल्यावर हे आपल्या लक्षात येईलच. या देशात स्वतःचे सैन्य, सरकार आणि न्यायपालिका असताना सुद्धा काश्मीरमध्ये हिंदूंना न्याय मिळू शकला नाही. अनेक ठिकाणी धार्मिक दंग्यांमध्ये केवळ ते हिंदू होते म्हणून अनेक जण मारले गेले आहेत. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी विर सावरकरांनी हिंदू धर्मियांना दिशा दाखविली आहे, विचार दिला आहे. या विचारांवर आज समस्त हिंदू समाजाने मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदे सारख्या अनेक संघटना जगात हिंदूंचा आवाज बळकट करत आहेत. हिंदूंना एकत्र आणण्यासाठी असंघटना झटत आहेत जर का आपण एकत्र आलो नाहीतर आज जी बांगलादेशमध्ये पश्चिम बंगाल मध्ये केरळमध्ये परिस्थिती दिसत आहे तीच परिस्थिती आपल्या येथेही घेण्यास वेळ लागणार नाही.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष दिघे, प्रमुख पाहुणे रमेश चव्हाण गुरुजी यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले.

ruchira top