रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;55 रक्तदात्यांनी केले रक्तदान
मालवण : ओरोस ब्लड बँकमधील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रविवार दि. 25 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन एकता मित्रमंडळाचे सदस्य माजी नगरसेवक श्री उत्तम पेडणेकर त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती शर्वरी पाटकर , डॉ.जुई देसाई , ऍड ऋषी देसाई, राजा शंकरदास , सुधीर धुरी ,उमेश सांगोडकर, अमेय देसाई , मंदार ओरोसकर. आदी उपस्थित होते.

शिबिर यशस्वी होण्यासाठी एकता मित्रमंडळाचे विद्याधर मेस्त्री,हितेंद्र हिर्लोस्कर , राजू गिरकर, तुषार मेस्त्री, रोहित गरगट्टे, पपू वणकुद्रे, मिलिंद कडू, ललित मेस्त्री, किरण रेडकर, विवेक गरगट्टे ,रवी गरगट्टे, सुनील गरगट्टे,चेतन हरमलकर, कुलराज बांदेकर अमित नाईक, केदार देसाई, अभी खानोलकर, किरण देसाई, आशा देसाई,ऋतुजा देसाई, करिश्मा देसाई , लिशा कडू, यथार्थ कडू, जुई गरगट्टे, अभी गरगट्टे यांचे सहकार्य लाभले.
तसेच ग्लोबल रक्तदाते ,मालवण समूहाचे विजय पांचाळ , विकास पांचाळ, राजा शांकरदास, संदीप पेडणेकर तसेच ग्लोबल रक्तविरांगणा नेहा कोळंबकर (शंकरदास), राधा केरकर , पल्लवी तारी (खानोलकर), ऋषा पाटील, तसेच ओरोस ब्लड बँक च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी सुरवसे, मयुरी शिंदे , नेहा परब, आदिनाथ राठोड, प्रथमेश घाडी, नंदकुमार आडकर , नितीन गावकर यांचे रक्तसंकलानासाठी सहकार्य लाभले.
या शिबिरास माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. श्रीमती रजनी बेलवलकर यांनी आर्थिक सहकार्य केले.अमेय देसाई यांनी सर्वांचे आभार मानले .

