आम. नितेश राणे यांची सलग १२ व्या वर्षी गणेश भक्तांसाठी अभिनव प्रवास योजना
कोकणवासीयांसाठी निघणार मोदी एक्सप्रेस ट्रेन
सिंधुदुर्ग : गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी चाकरमानी आतुर असतात. म्हणूनच गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या कोकणवासीय गणेश भक्तांसाठी सलग बाराव्या वर्षी भारतीय जनता पक्ष आणि आमदार नितेश राणे यांच्या वतीने मोदी एक्सप्रेस ट्रेन चे आयोजन केले आहे.
बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता, दादर स्टेशन, प्लॅटफॉर्म नं. ८ वरून ही ट्रेन रवाना होणार आहे. सर्व प्रवासी गणेश भक्तांसाठी जेवण व पाण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे.२८,२९,३०,ऑगस्ट रोजी तिकीट बुकिंग केली जाणार आहे. तिकीट बुकिंग साठी भारतीय जनता पक्षाचा कणकवली , वैभववाडी , देवगड कार्यालय अध्यक्षांशी संपर्क साधायचा आहे.

