उद्योजक श्री पंकज वर्दम मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन
संतोष हिवाळेकर | पोईप : पोईप गावचे उद्योजक व उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम व मित्र मंडळ यांच्या वतीने मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी भव्य नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सकाळी ठीक 10 वाजता सुरू होणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक 5001 (पंकज वर्दम पुरस्कृत), द्वितीय पारितोषिक 3,001 रुपये ( यश वर्दम पुरस्कृत ) व आकर्षक चषक (अमेय डिचवलकर) यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील स्पर्धकांना 5 नारळ देण्यात येणार आहेत, तसेच नाव ही नोंदणी स्पर्धेच्या दिवशी फक्त 11 वाजेपर्यंत केली जाणार आहे.तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पंकज वर्दम मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विशाल 9226302332, सोहम 7972892241,यश 8208270230 यांच्याशी संपर्क साधावा.

