Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

खोटे बोला रेटून बोला.. हेच आ. वैभव नाईक यांचे कार्य

गावागावात खोटी पत्रे पाठविण्याचे धंदे आता थांबवा

गुरामवाड पेंडूर मोगरणे रस्ता पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्याच माध्यमातून मंजूर

खरारे-पेंडूर उपसरपंच सुमित सावंत यांनी ठणकावले

मालवण | प्रतिनिधी : खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांनी महायुती सरकार यांच्या माध्यमातूनच गतिमान विकास होत असून विकासकामे मंजूर होत आहेत. याचा पाठपुरावा आमचे नेते करतात आणि निधी मंजूर करून आणतात. आम्ही पाठपुरावा केल्याचे पुरावे दाखवतो आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा दाखवावे अन्यथा गावाची माफी मागावी. असा सूचक सल्ला खरारे-पेंडूर उपसरपंच सुमित सावंत यांनी दिला आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन 2024 -25 अंतर्गत गुरामवाड पेंडूर मोगरणे या 3/600 ते 4/400 मार्ग ग्रामा. 381 हा रस्ता भाजपा नेते खा. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला. असे असताना आ.वैभव नाईक स्वतः घेत गावात आपल्या नावाची पत्रे पाठवून खोटे श्रेय घेत आहेत. परंतु या कामासाठी त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना जनाची नाही तर मनाची तरी लाज राखत असे खोटे प्रकार त्यांनी वेळीच थांबवावे. या रस्त्याची दुरावस्था झालेली असताना सदरील भागातील लोक लोकसभा निवडणुकीला मतदान करायला जात नव्हते पण अश्या वेळी प्रत्यक्षात त्या वाडीत जात भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना शब्द दिला आणि त्यांना मतदानासाठी तयार केले. दोन महिन्यातच माजी खासदार निलेश राणे यांच्या सांगण्यावरून मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या शिफारशीने पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी हे काम मंजूर केले. यासाठी केलेला पाठपुरावा आमच्या जवळ आहे त्यामुळे उगाच सर्व कामावर टिकली लावण्याचे खोटे धंदे आमदार वैभव नाईक यांनी थांबवावेत. कामे मंजूर करण्यासाठी कुडाळ मालवणच्या जनतेने तुम्हाला 10 वर्षे दिली होती आता तुमची संधी गेली त्यामुळे जनता आता सूज्ञ आहे तुमच्या या खोट्या प्रयत्नांना यापुढे असेच हाणून पाडू एवढे नक्की. असेही सुमित सावंत यांनी प्रसिद्धी पात्रातून स्पष्ट केले आहे.

ruchira top