Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आलेला विकास निधी केवळ भाजपा युती सरकारच्या माध्यमातून…

वैभव नाईक यांनी याचे फुकटचे श्रेय घेऊ नये - चेंदवण सरपंच वैभव चेंदवणकर

कुडाळ | प्रतिनिधी : चेंदवण गावामध्ये जनसुविधा व इतर योजनेमधून जो निधी विकास कामांसाठी आला आहे हा निधी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातून आला आहे, असे चेंदवण सरपंच वैभव चेंदवणकर यांनी सांगून या विकास कामांचे श्रेय आम.वैभव नाईक यांनी घेऊ नये, गेल्या दहा वर्षात गावाच्या विकास प्रक्रियेकडे आमदार वैभव नाईक यांनी लक्ष दिलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षात आमदार वैभव नाईक यांनी चेंदवण गावाला आश्वासने देऊन पाणी पुसण्याचे काम केले आहे. आता मात्र गावांमध्ये जो विकास निधी आला आहे, त्याचे श्रेय घेण्याचे काम ते करत आहेत.

मागील सात वर्षापासून गावातील वेलवाडी येथील डोंगर खचतोय परंतु त्याकडे देखील त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही, मात्र निलेश राणे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून संरक्षण भिंतीचे काम प्रगतीपथावर आणले आहे, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावर्षी जनसुविधा योजनेतून चेंदवण कोचरेकरवाडी ते नवदुर्गा मंदिर पर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, अंदाजे रक्कम ५ लाख व चेंदवण निरूखेवाडी रस्ता खडीकरण , डांबरीकरण करणे, अंदाजित रक्कम १० लाख ही दोन्ही विकास कामे खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून झाली आहेत.

तसेच देऊळवाडी रस्ता, नाईकवाडी अंगणवाडी इमारत दुरुस्ती ही कामे सुद्धा भाजपाच्या माध्यमातून आली आहे. यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. भाजपाच्या माध्यमातून आलेल्या या विकास कामांचे श्रेय आमदार वैभव नाईक यांनी घेऊ नये. जर तुम्ही या गावासाठी विकास निधी दिला असेल तर त्याचे पुरावे द्या, अन्यथा गावाची माफी मागा, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तसेच हा विकास निधी गावांमध्ये आणण्यासाठी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, उपसरपंच रश्मी नाईक, देवेंद्र नाईक, सुनील चेंडवणकर,भूपेश चेंदवणकर, प्रशांत तेंडोलकर, सूर्यकांत शृंगारे, नारायण शृंगारे, ऋषिकेश माधव, संजय परब, हेमंत जुवेकर पाठपुरावा केला आहे.

ruchira top