उभ्या कंटेनरला धडक ; मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे अपघात
कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर वागदे येथील हॉटेल मालवणी जवळ मध्यरात्री उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून दुचाकीची धडक बसल्याने दोन युवक जागीच ठार झाले.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर हॉटेल मालवणी जवळ कंटेनर महामार्गावर उभा असताना कणकवलीहून ओरोस च्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची धडक उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून बसली. अपघातात दुचाकीवर असलेले कणकवली परबवाडी येथील संकेत नरेंद्र सावंत (वय २४) व कणकवली विद्यानगर येथील साहिल संतोष भगत (वय २३) यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, संतोष शिंदे, यांनी अपघातस्थळी धाव घेतली.

