Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

त्यांना मिळाले जिवदान ; प्रशासनाची तत्परता…

एनडीआरएफ पथकासह प्रशासनाच्या तत्परतेचे होतंय कौतुक

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन सतर्कतेने परिस्थिती हाताळत आहे. जिल्ह्यात कोणतीही हानी होऊ नये यासाठी यंत्रणा सतर्क आहे. दरम्यान सकाळी पोलीस पाटलांनी कुडाळ रेल्वे स्टेशन शेजारील सिद्धिविनायक हॉल परिसरात काही जनावरे पाण्यात अडकल्याचे कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार विरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, नायब तहसीलदार प्रतीक आढाव, एनडीआरएफचे पथक प्रमुख प्रमोद राय सतर्क झाले आणि एनडीआरएफचे पथक संबंधित ठिकाणी तात्काळ पोहोचले. एक रेडा दोरीने बांधलेला होता त्या परिसरात पाणी वाढले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या रेड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पथकाने पुराच्या पाण्यामध्ये बोटीने जाऊन रेड्याला बांधलेली दोरी तोडली आणि त्या रेड्याला सुखरूप बाहेर काढले. त्याठिकाणी म्हैस व अन्य जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

तसेच कुडाळ येथील गुलमोहर हॉटेल परिसरात पुराच्या पाण्यात २ शेळ्या अडकलेल्या आहेत. त्यांची देखील सुटका NDRF पथकाने केली आहे.
नेहमी नागरिकांच्या मदतीला देवाप्रमाणे धावणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाने आज मुक्या जनावराला देखील जिवदान दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्राण्यांना जन्मताच पाण्यात पोहता येते परंतु बांधून असलेल्या प्राण्याला अश्या आपत्ती स्थितीत कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नाही आणि ते संकटात सापडतात. तरी योग्य ती खबरदारी सर्वांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

ruchira top