Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

महिलेचा जागीच मृत्यू…

वीज वितरण विरोधात ग्रामस्थ आक्रमक

काळसे : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतीकमासाठी जाणाऱ्या श्रीमती अनिता अंकुश कुडाळकर वय ६५ वर्षे यांचा पायवाटेवर तुटून पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेवर पाय पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

अनिता कुडाळकर यांना घरी येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा मुलगा भूषण हा त्यांना पाहण्यासाठी गेला असता दुर्घटना त्याच्या निदर्शनास आली.

वाडीतील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण माड्ये, अनुष्का हेरेकर, नाना खोत, बाळू खोत, भाऊ नार्वेकर, श्रीकांत जावकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि वीज वितरण चे अधिकारी आणि पोलीस प्रशासनास दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील विनायक प्रभु, वायरमन आबा परब, कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी प्रकाश मोरे आणि सिद्धेश चिपकर हे घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान वीज वितरणच्या गलथान कारभारा विरोधात बागबाडी ग्रामस्थ आक्रमक झाले. जोपर्यंत वीज वितरण अधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह जाग्यावरुन हलवू देणार नाही. अशी भूमिका घेण्यात आली. दुर्घटनेला सर्वस्वी वीज वितरण जबाबदार आहे. वीज तारावर स्पेसर, गार्डर नसल्यामुळे ही दुर्घटना घडली त्यामुळे वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा प्राण गेला आहे. असा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केला.

बागवाडीतील कमकुवत विज तारांबद्दल तसेच खाली आलेल्या तारांबद्दल चार महिने अगोदर पासून ग्रामस्थ मागणी करत होते. तसेच २१ ऑगस्ट रोजी कनिष्ठ अभियंता अर्जुन भिसे यांना प्रत्यक्ष भेटून वीज वितरणच्या विद्युत लाईनच्या दुरुस्तीसाठी मागणी बागवाडी ग्रामस्थ यांनी केली होती, असे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले.

ruchira top