संघटनेच्या प्रश्नांवर सर्वतोपरी मदत करण्याचे निलेश राणे यांचे आश्वासन
मालवण : मालवण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता व ठेकेदार संघटनेने माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली.या भेटीत मालवण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता व ठेकेदार संघटनेने मांडलेल्या विषयावर निलेश राणे यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील कामे ही तालुका मर्यादित राहतील, तालुका बाहेरचे ठेकेदार यानंतर मालवण मध्ये कामे भरणार नाहीत, याची योग्य ती काळजी आपण घेऊ अशी माहिती निलेश राणे यांनी दिली.
आपण माझ्या कडे आलात तुम्हाला मदत आम्ही नक्की करणार, आपण ही आपल्या मागे अशी ताकद दाखवा, असे निलेश राणे यांनी म्हटले. सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंता व तालुक्यातील अन्य ठेकेदार यांनी आमचा आपल्याला नेहमीच पाठिंबा आहे,असे या भेटीत सांगितले.
यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब,तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,माजी उपसभापती राजू परुळेकर, युवा तालुकाध्यक्ष अभि लाड व अन्य इतर पदाधिकारी, तसेच मालवण तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंता, अन्य कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते उपस्थित होते.

