Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

बांधकाम कामगारांना मिळाला न्याय…

बांधकाम कामगारांना मिळाला न्याय…

भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सत्यविजय जाधव, बांधकाम कामगार महासंघ जिल्हाध्यक्ष भगवान साटम, कल्याणकारी संघ जिल्हाध्यक्ष बाबला नांदोस्कर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे मानले आभार

मालवण : संघटनेच्या मागणीनुसार माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्या नंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी बांधकाम कामगारांना ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र देण्याबाबत गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र काढले आहे.

ग्रामसेवक यांना शासनाच्या वेळोवेळच्या आदेशांचे पालन करुन बांधकाम कामगारांना ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र देण्याचे कळविले आहे.

याबाबत भारतीय मजदूर संघ जिल्हा अध्यक्ष सत्यविजय जाधव, बांधकाम कामगार महासंघ जिल्हा अध्यक्ष भगवान साटम व बांधकाम कामगार कल्याणकारी संघ जिल्हा अध्यक्ष बाबला नांदोसकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

भारतीय मजदूर संघाने माजी खासदार निलेश राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन बांधकाम कामगारांना शासन आदेशानुसार ग्रामसेवक ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र देत नाहीत यासाठी लक्ष वेधले होते. तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी संघ जिल्हा अध्यक्ष बाबला नांदोसकर व त्यांच्या पदाधिकारी यांनी १३ ऑगस्ट रोजी ओरस जनता दरबार येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे याप्रश्नी लक्ष वेधले होते. यास अनुसरून माजी खासदार निलेश राणे यांनी हा प्रश्न योग्य असल्याचे सांगत कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि शासन आदेशांचे पालन झाले पाहीजे अशी भुमिका मांडली. त्या नंतर पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी उपस्थित जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासन आदेशानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देऊन तशी तातडीने प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्याचे सूचीत केले होते. या नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांनी १४ ऑगस्ट २०२४ च्या पत्रानुसार सर्व गटविकास अधिकारी यांना कळवून शासन आदेशानुसार ग्रामसेवक यांनी बांधकाम कामगारांना ९० दिवस प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्याचे कळविले आहे.

या बाबत भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सत्यविजय जाधव, बांधकाम कामगार महासंघ जिल्हा अध्यक्ष भगवान साटम व बांधकाम कामगार कल्याणकारी संघ जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेशजी राणे यांचे कामगारांना न्याय मिळवून दिल्या बद्दल आभार मानले आहेत. तसेच लवकरच भेट घेऊन प्रत्यक्ष आभार व्यक्त करणार असल्याचे सांगितले.

ruchira top