आ. वैभव नाईक यांनी दिले तीन लाख विकसनिधीचे पत्र
ग्रामस्थांनी व्यक्त केले आभार
मालवण : कोळंब सर्जेकोट या दोन गावांसाठी असलेल्या स्मशान भूमीची शेड जमीनदोस्त झाली आहे. त्याठिकाणी असलेल्या समस्या ग्रामस्थांच्या माध्यमातून समोर आल्यानंतर आ. वैभव नाईक यांनी त्याची तात्काळ दखल घेत 3 लाख रुपये आपल्या स्थानिक विकास निधीतून दिले आहेत. याबाबत पत्र त्यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे.

याबाबत श्रीकृष्ण मंडळ अध्यक्ष संदीप शेलटकर, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. संजना शेलटकर, संपदा प्रभू, सौ. नंदा बावकर, स्वप्नील परब तसेच सर्जेकोट ग्रा. प. सदस्य सौ. भारती आडकर, विनायक कोळंबकर, संतोष शेलटकर, सदानंद कांदळगावकर, प्रसाद पाटील, निखिल नेमळेकर, शुभम परब, अभिजित आडकर, गोविंद सावजी, चिन्मय शेलटकर, यश कोयंडे, गणेश कांदळगावकर, यश शेलटकर, कामेश शेलटकर, दुर्गेश टिकम यांसह ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.

