Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

पालकमंत्र्यांकडून कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कठोर कारवाईची अपेक्षा

पालकमंत्र्यांकडून कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कठोर कारवाईची अपेक्षा

महा जनता दरबाराचे आयोजन करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दाखवली कार्यक्षमतेची चुणूक

मालवण नगरीचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचे गौरोदगार

मालवण : सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय प्रलंबित कामाबाबत जनता दरबार या महिन्यात आयोजित केला होता. यावेळी जिह्यातून हजारो तक्रारी या जनता दरबारात दाखल झाल्यात . यातील 70% पेक्षा जास्त तक्रारींचे लगेच निवारण करण्यात आले. आणि उर्वरित तक्रारी निवारण करण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात आला. आता या शिल्लक तक्रारी निवारण झाले कि नाही या साठी या महिन्यातच पुन्हा जनतादरबाराचे आयोजन करून तपासले गेले. जिल्हा पातळीवर ओरोस येथे एकाच ठिकाणी जनता दरबार भरवून जर एवढ्या तक्रारी आल्या मग त्या त्या शहराच्या ठिकाणी किती तक्रारी असतील याची खूणगाठ पालकमंत्री यांनी नक्कीच बांधलेली असेल . त्यामुळे आता खरी गरज आहे ती ज्या अधिकाऱ्याच्या कामचुकार पणामुळे एखाद्या शहराची विकासकामे ठप्प झाली असतील , आरोग्य, स्वच्छता यांचा प्रश्न निर्माण झाला असेल अश्या अधिकाऱ्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करायला हवी, असे महेश कांदळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

त्यासोबतच कांदळकर यांनी म्हंटले आहे की, मालवणचा नगराध्यक्ष होण्यापूर्वी त्याच नगर पालिकेत 21 वर्षे सरकारी कर्मचारी त्यामुळेच सरकारी अधिकारी आणि त्यांची मानसिकतेबाबत महिती आहे.मी त्याचा जवळून अनुभव घेतला आहे.सरकारी कामात कामचुकार कर्मचारी यांच्या वर कुठलीही मोठी कारवाई केली जात नाही ,या उलट एखाद्या कार्यक्षम कर्मचारी यांच्या कडून काम करून घेऊन कामाचा निपटारा केला जातो . त्यामुळे काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई न केल्या मुळे,काम करणाऱ्या कर्मचारी याची हळू हळू काम न करण्याची मानसिकता होते ,आणि मग कामाचा निपटारा न झाल्यान, अशा प्रकारच्या असंख्य तक्रारी जनता दरबारात दाखल होतात . यावेळी हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या तक्रारींचं मुख्य कारण हे प्रशासकीय राजवट हेच आहे.

गेले अडीच वर्षे निवडणूका न झाल्याने देवगड , कुडाळ वगळता सर्वच कार्यालयात प्रशासकीय राज चालू आहे . सर्वच अधिकारी , कर्मचारी कामचुकार नाहीत. पण जे कर्मचारी कामचुकार आहेत त्यांनी या प्रशासकीय राजवटीचा फायदा घेऊन बेलगाम काम केले आहे, आणि त्यामुळे काम न झालेल्या जनतेचा रोष आता लोकप्रतिनिधी वर यायला लागला आहे . कारण जेव्हा लोकप्रतिनिधी पदावर असतात, तेव्हा त्याना निवडून दिलेल्या सदस्याने आपले काम केले पाहिजे, असा जनतेचा आग्रह असतो. शक्यतो कोणीही थेट अधिकारी यांच्याकडे जात नाही. त्यामुळे एखादे काम अधिकाऱ्यामुळे झाले नाही, तरी त्याचा दोष जनता सत्ताधारी किवा आपल्या त्या सदस्याला देत असतो. आणि या राजकीय स्थितीचा फायदा घेवून अधिकारी नामानिराळे होत असतात. ही वस्तुस्थिती आहे.राजकीय इतिहासात पहिल्या प्रथमच प्रशासकीय राजवट अडीज वर्षाच्या वर झाल्यानेच या प्रशासकीय अनागोंदी कारभाराच्या मर्यादा उघड्या झाल्या आणि जनतेला त्याची प्रचिती आली आहे, असे कांदळकर यांनी म्हटले आहे.

यापुढे कांदळकर यांनी प्रसिध्दीपत्रकामध्ये म्हंटले आहे, अधिकाऱ्याची सकारात्मक काम करण्याची मानसिकता असेल, तर काय होऊ शकते, याचे सिंधदुर्गात चांगले उदाहरण वेंगुर्ला नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दाखवले आहे.त्यानी लोकप्रतिनिधीच्या साहाय्याने स्वच्छ सर्वेक्षणाचे एवढे चांगले काम केले की, महाराष्ट्रातील नगरपालिका या नगरपालिकेला भेटी देत आहेत.त्यांच्या स्वच्छतेचा धडा पाठ्यपुस्तकात घेतला गेला, कोट्यावधी रुपयाची बक्षीस प्राप्त झाली, सांगण्याचा उद्देश हाच कि जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद क वर्ग नगरपरिषद असून मुख्याधिकारी समान वेतन श्रेणीचे आहेत . शासनाकडून येणार स्वच्छता निधी सुद्धा समान, मग असे असताना रामदास कोकरे सारखे एक मुख्य अधिकारी वेंगुर्ला नगर पालिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात,मग जिल्ह्यातील इतर नगर पालिका हे का करु शकत नाहीत? . याचे कारण असे अधिकारी,त्यांच्यावर कारवाईची नसलेली भीती.

शासन स्वछतेच्या बाबतीत जसे 1 ते 3 नंबर येणाऱ्यांना कोट्यांनी रुपयाची बक्षीस जाहीर करते. त्याच प्रमाणे काम न करणाऱ्या नगरपालिकेचा निधी कमी न करता काम न करणाऱ्या अधिकारी यांच्या वर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, म्हणजे व्यक्तिगत कारवाईच्या धास्तीने तरी अधिकारी कामचुकार पणा करण्याची हिम्मत करणार नाही.

याच पद्धतीने पालकमंत्री यांनी जनता दरबारात जाणीवपूर्वक कामचुकार करणाऱ्या अधिकारी , कर्मचारी यांच्या वर एखादी अशी कठोर प्रशासकीय कारवाई करावी की ज्याची दखल इतर कर्मचारी घेतील. अन्यथा या प्रशासकीय काळात सर्वच नाही.पण बहुतांशी सरकारी कार्यालयात अधिकाऱ्याची मानसिकता अशी झाली आहे,कि लोकप्रतिनिधी आपल काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि त्याची काम करण्याची मानसिकता अशीच राहिली तर नजीक होणाऱ्या निवडणुकानंतर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीना काम करताना त्याची वाईट प्रचिती येणार आहे, असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

ruchira top