Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

जनतेचा आवाज दाबण्यासाठीच जिल्ह्यात जमावबंदी - संजय पडते

बदलापूर प्रकरणी ठाकरे गटाचे पोलिसांना निवदेन

दोषींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी

कुडाळ : बदलापूरला दोन चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराचा शिवसेना ठाकरेगट पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. यातल्या दोषींना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाविरोधात या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटणार असल्याने जनतेचा आवाज दाबण्यासाठीच जिल्हा प्रशासनाने तातडीने जिल्ह्यात जमावबंदी केली असल्याचा आरोप यावेळी संजय पडते यांनी केला. आज कुडाळ पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन याबाबतचे निवेदन कुडाळ पोलिसांना दिले.


यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते आणि माजी उपसभापती श्रेया परब यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. चार वर्षांच्या चुमुरड्यांवर शाळेच्या शिपायाकडून अशा प्रकारचे कृत्य घडणे आणि त्याबाबत चारदिवस तक्रार दाखल होत नाही, या गोष्टी निंदनीय आहेत. त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, संपूर्ण जिल्ह्यात या घटनेच्या संदर्भात सरकार विरोधात ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.असे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर या घटनेचे तीव्र पडसाद सरकार विरोधात जिल्हाभरात नव्हे तर संपूर्ण राज्यात आणि देशभरात उमटणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जनतेचा आवाज दाबण्यासाठीच तातडीने जिल्हयात जमावबंदी लागू केली असा आरोप संजय पडते यांनी केला.


माजी उपसभापती श्रेया परब यांनी देखील या घटनेचा इथवर शब्दात निषेध करून दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. कोणतेही नेतृत्व नसतांना बदलापूरमध्ये जनता त्या पीडित चिमुरड्यांसाठी रस्यावर उतरली. त्यामुळे जनतेला शासनेने गृहीत धरून नये. त्या दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळाली तर देशात लोकशाही आहे यावर विश्वास बसेल. महाराष्ट्र बिहारच्या वाटणे जातोय कि काय अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. जन्मांला आलेली मुलगी या राज्यात सुरक्षित राहिली पाहिजे अशी मागणी सौ. परब यांनी यावेळी केली.


ठाकरे गटाच्या वतीने निवेदन पोलिसाना देण्यात आले. यावेळी संजय पडते, श्रेया परब यांच्या सह महिला शहर प्रमुख आणि नगरसेविका श्रेया गवंडे, युवा सेना उप जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, राजू गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेवक उदय मांजरेकर, संतोष शिरसाट, सई काळप, ज्योती जळवी, शीतल देशमुख, रोहिणी पाटील, अनुप नाईक, गंगाराम सडवेलकर, अष्पक कुडाळकर, नितीन सावंत, शुभम सिदगीकर, गोट्या चव्हाण, अनिकेत आंदुर्लेकर उपस्थित होते.

ruchira top