Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मालवण | श्री देव नारायण मंदिरात २४ मे पासून श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा.

मालवण | श्री देव नारायण मंदिरात २४ मे पासून श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा.

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात, अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २४ मे २०२६ ते रविवार, ३१ मे २०२६ या कालावधीत हा सप्ताह सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

या सोहळ्या अंतर्गत दररोज सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत, श्रीमद् भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन (संहिता वाचन), श्री विष्णू देवतेस सहस्र तुलसीदल अर्पण पूजाविधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्र नामावलीसहीत देवीला कुंकूमार्चन तसंच आयोजकांकडून ५ वर्षे ते ९ वर्षे या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न होणार आहेत. हे सर्व विधी 'संपूर्णपणे निःशुल्क' असल्याची माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे.

पुणे येथील सुप्रसिद्ध निरुपणकार श्री. प्रणव गोखले यांचं संध्याकाळी ४:३० ते ८:३० या वेळेत श्रीमद् भागवत महापुराणातील कृष्णलीलांचे मराठीतून निरूपण होईल.सोमवार, १ जून २०२६ रोजी मूर्ती विसर्जन मिरवणुकीने सोहळ्याची सांगता होणार आहे.या श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. सचिन वझे (9422435395), सौ. प्रीती वैद्य (9405930122), श्री. गजानन अभ्यंकर ( 9420728752) व सौ. शुभदा अभ्यंकर ( 9423053014) यांनी केले आहे. श्री. देव नारायण मंदिराचे नित्य पुरोहीत श्री. सुमेध जोशी यांचे या सोहळ्याला सक्रीय योगदान आहे.

या सोहळ्याला मालवण ग्रामदेवतांचे आशीर्वाद, देवस्थान संबंधित विश्वस्त, मान्यवर, समस्त गांवकर मंडळी यांचे सौजन्य सहकार्य आणि बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

rapan bottom