Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

तारकर्ली समुद्रात बुडून पुणे येथील पर्यटक बेपत्ता

तारकर्ली समुद्रात बुडून पुणे येथील पर्यटक बेपत्ता

बुडालेल्या दोघांपैकी एकाला स्थानिकांना वाचावले

मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पुण्यातील दोन पर्यटकांपैकी एक जण पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या बचाव कार्यात दुसऱ्या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

समर्थ गणेश कर्पे (वय २२, रा. आंबेगाव, पुणे) असे पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, ऋषभ रविकिरण कदम असे वाचवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ऋषभवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पुणे येथील 'रेवती एन्टरप्रायजेस'मध्ये कामाला असलेले ऋषभ कदम आणि समर्थ कर्पे हे दोघे १९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. समाजकल्याण विभागातील आपले कार्यालयीन काम आटोपून ते मालवण येथे पर्यटनासाठी थांबले होते. गुरुवारी दुपारी हे दोघेही तारकर्ली येथील एमटीडीसी रिसॉर्टसमोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरले.
समुद्रात आंघोळ करत असताना अचानक पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने समुद्रात उड्या मारल्या. ग्रामस्थांनी ऋषभ कदम याला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले, मात्र समर्थ कर्पे हा लाटांच्या तडाख्यात सापडल्याने खोल पाण्यात वाहून गेला आणि बेपत्ता झाला.

पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी संकेत तारी, दत्तराज चव्हाण, वैभव खोबरेकर, महेंद्र चव्हाण आणि वैभव सावंत व स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या तत्परतेमुळे एका पर्यटकाचे प्राण वाचू शकले.
पाण्यातून बाहेर काढलेल्या ऋषभची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी '१०८' रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला होता. मात्र, तब्बल अर्धा तास उलटून गेला तरी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर वेळ वाया न घालवता स्थानिकांनी ऋषभला दुचाकीवर बसवून तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि पोलीस कर्मचारी जनार्दन रेवंडकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेतली. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बेपत्ता समर्थ कर्पे याचा समुद्रात शोध घेण्याचे काम सुरू आहे.

हृदयद्रावक

समुद्रात उतरलेल्या ऋषभच्या मोबाईलवर समर्थच्या आईचा फोन आला होता. ऋषभने तो फोन समर्थच्या हातात दिला. समर्थने आईशी काही वेळ संवाद साधला, फोन ठेवला आणि तो पाण्यात गेला; मात्र त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.

फोटो : समर्थ कर्पे (समुद्रात बुडून बेपत्ता)

rapan bottom