Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

पडद्या वरील व्हिलन, रियल लाइफ पर्यावरणीय हिरो : अभिनेते सयाजी शिंदे

पडद्या वरील व्हिलन, रियल लाइफ पर्यावरणीय हिरो : अभिनेते सयाजी शिंदे

राहुल जाधव | सिंधुदुर्ग : ज्येष्ठ अभिनेते. तथा पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे हे यांनी मराठी सोबत इतर भाषात आपली छाप सोडली आहे. सोबतच त्यांचा पर्यावरण संरक्षण क्षेत्रात देखील मोलाचा वाटा आहे. दिनांक 18 मे 2026 रोजी सयाजी शिंदे हे एका मुव्ही च्या शूट साठी निवती या ठिकाणी आले असता त्यांनी "बीज संकलनाचा" कार्यक्रम घेण्याचे ठरवले.

महिन्या भर पूर्वी सयाजी शिंदे यांनी "डुंगोबाची राई" या देवस्थानाला भेट देऊन तेथील प्लास्टिक कचरा स्वच्छतेसाठी लोकांना आवाहन केले होते. व त्यांच्या आवाजाला साथ देऊन यूथ बिट्स फॉर क्लायमेट संलग्न इकॉमेट्स व स्थानिक पर्यावरण प्रेमी मंदार गावडे यांनी तेथील स्वच्छतेला सुरुवात केली, व आता तेथील ग्रामस्थ देखिल या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत आहेत.

बीज संकलनाच्या कार्यक्रमाला "डुंगोबाची राई" मधून सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी सयाजी शिंदे यांच्या सोबत डॉ. विश्वास चव्हाण (टिश्यू कल्चर तज्ज्ञ), विकास नलावडे (विकास हायटेक नर्सरी) व त्यांची टीम होती.
स्थानिक मानव प्रेमी व पर्यावरण रक्षक देखील आपल्या वेगवेगळ्या संकलित केलेल्या बियांसोबत तेथे पोहोचले, व सयाजी सरांची भेट घेतली. भेट घेताना संजय सावंत (वाईल्ड लाईफ वॉर्डन), मेगल डिसोझा( यूथ बिट्स फॉर क्लायमेट अध्यक्षा), दर्शन वेंगुर्लेकर (यूथ बिट्स फॉर क्लायमेट सभासद), राहुल जाधव(यूथ बिट्स फॉर क्लायमेट सभासद), मंदार गावडे (वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन), डॉ. धूमक ( वाईल्ड लाईफ रेस्क्युअर), विनीत किनालेकर, अनुराग सिनारी असे अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

बीज संकलनाची आवड आणि झाडांबद्दल प्रेम हे सयाजी सरांना त्यांच्या आई मुळे लागले. सर म्हणतात त्यांच्या आई श्रीमती सुलोचना शिंदे या त्यांच्या बटव्यामध्ये नेहमी बिया घेऊन फिरायच्या. त्यामुळे पर्यावरणासोबत त्यांची भावनिक बाजू देखील जोडलेली आहे हे दिसून येते.सरांनी स्थानिक ग्रामपंचायत व पोलिस स्थानकांना देखील भेट देऊन पर्यावरण संगोपन व बीज संकलनाबद्दल आवाहन केले. तेथे त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

पुढे हा बीज संकलनाचा दौरा आंबोलीला जाऊन पोहोचला तेथे वनविभागाने त्यांचे स्वागत केले व आंबोलीच्या जंगलाची सफारी केली गेली. अनेक दुर्मिळ झाडांवर दृष्टी टाकण्यात आली व वनविभागाने बीज संकलनाला मदत केली आणि बक्षीस म्हणून वेगवेगळ्या बिया सरांना दिल्या. असे हे कार्यक्रम आपण सतत घेत राहू , झाडे लावत राहू, मोठी झाडे वाचवत राहू असे आवाहन करत कार्यक्रमाची सांगता झाली

rapan bottom