Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

Malvan | मनसे प्रभारी तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती

Malvan | मनसे प्रभारी तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती

जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसे प्रभाविपणे कार्यरत राहील : मनसेचे सरचिटणीस तथा सिंधुदुर्गचे संपर्क अध्यक्ष संदीप दळवी

मालवण : समाजात सर्वसामान्यांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाविपणे कार्यरत राहील. असे प्रतिपादन मनसेचे राज्य सरचिटणीस तथा सिंधुदुर्गचे संपर्क अध्यक्ष संदीप दळवी यांनी आज येथे केले.
मालवण येथे मनसेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पक्षाचे नूतन तालुकाध्यक्ष म्हणून गॅरी अन्ननसिएशन यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आणि त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, शहराध्यक्ष सागर जाधव, जेनिफर अन्ननसिएशन यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दळवी म्हणाले, ज्या कर्नाटकात मराठी माणसांवर अन्याय आणि मारहाण होत आहे, त्याच कर्नाटकचा आंबा आपण विकत घेत आहोत, हे कुठेतरी थांबायला हवे. आपला पैसा कर्नाटकात जाण्याऐवजी, आपण स्थानिक मराठी शेतकऱ्यांच्या मालाला प्राधान्य देऊन तोच विकत घेतला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी काळात मनसेमध्ये अनेक नवीन बदल केले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, स्थानिक मच्छीमारांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. जिल्ह्यात परप्रांतीयांचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, स्थानिक प्रशासनाने आणि नागरिकांनी हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी केवळ मनसे प्रमुख राज ठाकरे हेच प्रामाणिकपणे लढा देत असून, पक्षाचे विचार जिल्ह्यातील गावागावात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने जोमाने कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.

धीरज परब म्हणाले, स्थानिक पातळीवर सविस्तर चर्चा करून लोकांच्या मनातील विचार ओळखूनच गॅरी अन्ननसिएशन यांच्यावर मालवण तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईत असो वा कोकणात, जिथे अन्याय होईल, तिथे मनसेचा आवाज कडाडलाच पाहिजे. असेही ते म्हणाले.

सौ. मोनिका फर्नांडिस म्हणाल्या, संदीप दळवी यांच्या रूपाने जिल्ह्याला एक खंबीर नेतृत्व मिळाले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे जाळे अधिक मजबूत होईल. आपला जिल्हा आणि आपले गाव आपणच सांभाळले पाहिजे, नाहीतर परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे आपल्या मतदारसंघांवर आणि संस्कृतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल. या मातीतील जागांवर आणि व्यवसायांवर पहिला अधिकार आपल्या स्थानिक युवा पिढीचा असायला हवा. कुणावरही अन्याय होत असल्यास भीती न बाळगता आवाज उठवण्याचे आणि मनसैनिकांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी स्थानिक जनतेला केले. नूतन तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी काम करून दाखवणार असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी केले. आभार शहराध्यक्ष सागर जाधव यांनी मानले.

rapan bottom