Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

वैभववाडी | सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले शहर

वैभववाडी | सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले शहर

नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला यशाची साथ

'स्वगणना २०२७' मध्ये वाभवे-वैभववाडी शहराची दैदिप्यमान झेप

सिंधुदुर्ग : “स्वगणना २०२७” अभियानात वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने उल्लेखनीय आणि दैदिप्यमान कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे पहिले शहर होण्याचा मान मिळवला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत प्रशासनाने राबविलेल्या प्रभावी जनजागृती मोहिमेमुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली.



नगरपंचायत वाभवे-वैभववाडीचे मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांनी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत विशेष स्वगणना सहाय्य पथके तयार करून नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण केली. शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत स्वगणनेचे महत्त्व पोहोचविण्यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांचा प्रभावी वापर केला.

बॅनरद्वारे प्रसिद्धी, घरोघरी जाऊन पथकांकडून प्रबोधन, कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची तत्काळ स्वगणना पूर्ण करून घेणे तसेच प्रभागनिहाय लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेणे अशा विविध उपक्रमांद्वारे नागरिकांना स्वगणनेसाठी प्रोत्साहित करण्यात आले. प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने नगरपंचायत क्षेत्रातील वास्तव्यास असलेल्या सर्व ४०४ कुटुंबांची स्वगणना यशस्वीरित्या पूर्ण झाली.
या यशामागे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. तसेच नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, सर्व नगरसेवक, नगरपंचायत कर्मचारी व सहाय्य पथकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांनी व्यक्त केली.



वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर एक आदर्श निर्माण झाला असून प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून कोणतेही उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य होऊ शकते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

rapan bottom