Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल

‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील

इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन

सिंधुदुर्ग : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनाने ‘हरित प्रशासन’च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल टाकले आहे.



यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या इलेक्ट्रिकल वाहनाचे प्रत्यक्ष चार्जिंग करून या सुविधेची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणपूरक विकासाची गरज अधोरेखित केली. वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या विविध स्तरांवर हरित ऊर्जा आणि स्वच्छ पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा सुविधा अधिकाधिक उभारल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या चार्जिंग स्टेशनमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंगची सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे इलेक्ट्रिकल वाहनांच्या वापराला चालना मिळणार असून पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.

rapan bottom