मालवण : मालवण तालुक्यातील आडारीवाडी येथील जागृत देवस्थान श्री देव महापुरुष मंदिराचा 21 वा वर्धापन दिन मंगळवार, दिनांक 12 मे 2026 रोजी भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धापन दिनानिमित्त सकाळी श्री देव महापुरुषाची विधिवत पूजा होणार असून, सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा संपन्न होईल. तसेच दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम रंगणार असून, रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

