मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील टोपीवाला हायस्कूलचे सेवानिवृत्त कलाशिक्षक बाळकृष्ण गंगाराम गिरकर (वय-८२) रा. बांगीवाडा मालवण यांचे शुक्रवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भाजप महिला शहर चिटणीस महिमा मयेकर यांचे ते वडील तर फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष महेश मयेकर यांचे ते सासरे होत. शनिवारी सकाळी सोमवार पेठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सेवानिवृत्त कलाशिक्षक बाळकृष्ण गिरकर यांचे निधन...
