Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांची मालवण सागरी महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम

आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांची मालवण सागरी महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित

शहरातील सर्व दहाही प्रभागात स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवणार : पूनम चव्हाण चव्हाण यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी मालवण शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्य सभापतींच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सागरी महामार्गावर देऊळवाडा ते हॉटेल रामेश्वर या परिसरात शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत आरोग्य विभाग कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच कार्यांलयीन अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य व स्वच्छता निरीक्षक संजय पवार, मंदार केळुस्कर, आनंद वळंजू, प्रतीक मालवणकर, पवन धुरी, शिवाजी जाधव यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते.

सागरी महामार्ग कचऱ्याने भरलेला आहे. यासाठी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. इथून पुढे प्रत्येक महिन्यात प्रत्येक प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाने त्या त्या प्रभागातही स्वच्छता मोहीम राबविणार आहोत. शहरातील सर्व दहाही प्रभागात एका महिन्यात एक प्रभाग एक दिवस आमची पूर्ण टीम स्वच्छता मोहिमेत सहभागी असेल. हा उपक्रम वर्षभर चालू राहील. यासाठी सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार असल्याचे आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी सांगितले.

फोटो : मालवण सागरी महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. (अमित खोत, मालवण)

rapan bottom